चोरीतील गाडी व आरोपी अद्यापही फरार! सेलू पोलिस आरोपीच्या शोधात

सेलू : चोरट्याने वर्षभरापूर्वी वडगांव (खुर्द) येथील घरुन दुचाकी गाडी चोरुन नेणारा आरोपी फरार असुन एक वर्षापासुन तो पोलिसांच्या हाती लागला नाही. तर चोराची गाडीही मिळाली नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वडगांव (खुर्द) येथील अर्चना अनिल चलाख यांचे घरी उभी असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच ३२ डब्ल्यू ९१३३ ही गाडी २५ मार्च २०१९ ला नंदकिशोर नानाजी चलाख रा. चक्रपाणी नगर नागपूर याने चोरून नेली. याची अर्चना चलाख यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपी व गाडीचा शोध घेतला तरीही आरोपी आणि गाडी हाती लागली नाही. पोलिसांनी आरोपीच्या नागपूर येथील घरीही शोध घेतला असता आरोपी गुंगारा देऊन तेथून फरार झाला. घटनेला वर्षं लोटली तरी आरोपी गाडी घेऊन फरार आहे. यातील गाडी व आरोपी कोणाला दिसून आल्यास सेलू पोलिसांना कळवावे, प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पचारे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here