लॉनमधील चौकीदाराची निर्घृण हत्या! परिसरात उडाली खळबळ; अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून काढला कोथळा बाहेर

देवळी : पुलगाव रोडवरील जय बजरंग जिनिंग शेजारी गुरुकृपा लॉनच्या चौकीदाराची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने धारदार शस्त्राचा वापर करून मृताचा कोथळा बाहेर काढला असून वसंत डोणे (५५) तिवारी ले-आऊट असे मृताचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री घडली असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

तिवारी ले-आऊट येथील वसंत डोणे हे गुरुकृपा नामक लॉनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. सोमवारी रात्री ते जेवणानंतर रात्रपाळीचे कर्तव्य बजावण्यासाठी लॉनमध्ये गेले होते. पण मंगळवारी त्यांचा मृतदेह लॉन परिसरात आढळून आला. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास शनी मंदिरातील पुजारी त्यांना भेटायला गेले असता वसंत यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यानंतर त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना देत देवळी पोलिसांना दिली. माहिती. मिळताच देवळी पोलिसांच्या चमूने घटनास्थळ गाठले. शिवाय श्‍वान व ठसे तज्ज्ञांच्या चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. याप्रकरणी देवळी पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी सध्या देवळी शहरात सदर घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

वसंतची हत्या करणारा कुटुंबातीलच का?

आरोपीने निर्दयतेचा कळस गाठत वसंत यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही हत्या कुटुंबातील लाखो रुपयांच्या हिंस्सेवाटणीच्या वादातून झाली असावी, असा कयास लावला जात असून पोलिसांच्या चोकशीअंतीच वास्तव उलगडणार आहे.

श्‍वान पथकाने दारवविला ५०० मीटरचा मार्ग

घटतास्थळी श्वान पथक दाखल होताच पोलिसांच्या श्‍वानानेही आरोपीचा पागोवा घेण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्ल केला. शवानाने लॉनच्या मागील भागात ५०० प्रीटरपर्यंत आरोपीचा मार्ग दाखविल्याचे सांगण्यात येते.

महामार्गासाठी शेत जमीन गेल्याने मिळाली मोठी रक्‍कम

मृत वसंत डोणे हे देवळी येथील खोंड यांचे जावई असल्याचे सांगितले जाते. शेतातून महामार्ग गेल्याने मोठी रक्‍कम मिळाल्याचे व याच रकमेच्या हिस्सेवाटणीच्या वादातून ही. घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. असे असले तरी पोलिसांच्या तपासाअंती या प्रकरणाचे रहस्य उलगडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here