पीएम स्वनिधी योजना : १,१६६ पथविक्रेत्यांना लाभ , १,६३२ प्रतीक्षेतच फेरीवाल्यांच्या आत्मनिर्भरतेला फेरीवाल्यांच्या आत्मनिर्भरतेला जिल्ह्यातील बँकांकडून ब्रेक

वर्धा : लॉकडाऊनच्या काळात पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना नव्याने व्यवसाय उभारण्यासाठी व आर्थिक बळ देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता शासनाने प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंमलात आणली . या योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना बँके मार्फत दहा हजार रुपयांचा पतपुरवठा केला जातो . त्यामुळे जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि चार नगरपंचायतीच्या माध्यमातून ३ हजार ६१२ अर्ज बँकांना पाठविण्यात आले . त्यापैकी १ हजार ९ ३५ अर्ज मंजूर करण्यात आले असून केवळ १ हजार १६६ पथविक्रेत्यांनाच कर्ज मिळाले आहे . अद्याप १ हजार ६३२ पथविक्रेते कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत बँकांकडूनच दिरंगाई होत असल्याने पथविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे . पथविक्रेत्यांची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी शहरातील सर्व पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले . त्यानुसार पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेकरिता पालिकेकडे रितसर अर्ज सादर केले . या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना १० हजार रुपयांचा पतपुरवठा होणार असून विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ७ टक्के व्याज सबसिडी व डिजिटल देवाण – घेवाणवर एका वर्षात १,२०० रुपये कॅशबॅक व पुढीलवेळी अधिक मोठ्या कर्जाचा लाभ मिळणार आहे . आतापर्यंत ३.६१२ पथविक्रेत्यांनी न.प. आणि नगरपंचायतकडे अर्ज सादर केले . त्यानंतर ते अर्ज बँकांना पाठविण्यात आले . त्यातील १ , ९ ३५ अर्ज मंजूर करण्यात आले तर ४५ अर्ज नामंजूर केले . सध्या १,१६६ पथविक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळाला असून १,६३२ लाभार्थी प्रतीक्षेत आहेत , त्यांना बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याची गरज आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here