महाआवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचवा : आमदार समीर कुणावार

हिंगणघाट : पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत महाआवास अभियान ग्रामीण गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडला. यावेळी पंचायत समिती हिंगणघाट येथील ऐकून 9 लाभार्थ्यांना चाबी देऊन गृह प्रवेशासंबंधी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार हिंगणघाट पंचायत समितीच्या सभापती शारदाताई आंबटकर, उपसभापती अमोलभाऊ गायकवाड, गटविकासअधिकारी दिनेश चौधरी, पंचायत समिती सदस्य मंजुषाताई ठक, पंचायत समिती सदस्य वैशालीताई पुरके उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना आमदार समीर कुणावर यांनी महाआवास अभियान योजना ग्रामीण जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा याकरिता योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन विषय साधनव्यक्ती नितीन सुकळकर तर आभार विस्ताराधिकारी उईके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here