

कारंजा (घाडगे) : शेतात गाई चारत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला. ही घटना हेटीकुंडी शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास घडली. वनविभागाकडून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. हेटीकुंडी शेतशिवारात चक्क वाघाने जर्सी गायीवर हल्ला करत फडशा पाडला.
गोपाल महादेव चारोडे हे शेतात गाई चारत असताना अचानक यांची जर्सी प्रजातीच्या गायीवर वाघाने हल्ला केल्याने गायीचा मृत्यू झाला. सदर गाईची किंमत अंदाजे ६० ते ७० असल्याचे शेतकरी सांगत आहे. सदर घटनेची वनविभागाला माहिती देताच टीम घटनास्थळी पोहोचली. सदर गाईचा पंचनामा करण्यात आला. यावेळी वनविभागाचे क्षेत्र अधिकारी डब्ल्यू, आर. ढोबाळे व वनरक्षक एम. ए. सोनकुसरे यांची उपस्थिती होती. वनविभागाकडून सदर नुकसानीची भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.