२ लाखाचा दारूसाठा जप्त! दोघांना अटक

समुद्रपुर : पोलिसांनी नाकाबंदी करून कारसह २ लाख ४१९ हजारांची दारु जप्त केली. दरम्यान २ आरोपांना ताब्यात घेतले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर जाम जवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान बुटीबोरी वरुन येत असलेल्या एमएच ०२ बीडी ९८५१ क्रमांकाच्या कारवर संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली.

या कारमधून 192 देशी दारुच्या शिश्या पोलिसांनी वायगाव (हळद्या) येथील रहिवासी शिवा विनोद सुरणकर(२०) व समुद्रपूर येथील वार्ड १३ मधील रहिवासी अनिकेत अर्जुन खुरपडे(22) याला ताब्यात घेतले. कार, दारु असा एकूण २ लाख १९ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दरम्यान बुटीबोरी ते जाम वरुन आलेल्या दुचाकी चालकाची संशयावरून तपासणी करण्यात आली. असता त्याच्याजवळून २४ विदेशी दारुच्या शिश्या मिळाल्या. आरोपी स्वी दुलीराम ननावरे(34) याला ताब्यात घेण्यात आले. हो कारवाई ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात विक्की मस्के, अरविंद्र येनुरकर, रवि पुरोहित, समीर कुरेशी, वैभव चरडे आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here