मोठी बातमी! शिवसेनेचा भाजपला दे धक्का; दहा नगरसेवक फोडले

वर्धा : मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीमधील काँग्रेसचे आमदार स्वबळाची भाषा वापरत आहे. एक ना अनेक विधान करण्यात येत आहे. अशातच शिवसेनेने भाजपला चक्क आव्हान दिले आहे. हिगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान दहा नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मागील दहा वर्षांपासून विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून सर्वांसमोर आला आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसली तरी सर्वाधिक आमदार भाजपचेच निवडून आले होते. मात्र, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने मिळून सरकार स्थापन केल्याने भाजपला सत्तेपासून मुकावे लागले. जवळपास दीड ते पावणे दोन वर्षांनंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बाँम्ब’मुळे राज्यात शिवसेना आणि भाजपच्यी युतीची चर्चा सुरू झाली होती.

मात्र, शिवसेनेने याकडे दुर्लक्ष करीत पक्ष बळकटीकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचा पहीला वार भाजपवरच केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह विद्यमान दहा नगरसेवक व दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. अस असतानाही भाजपचे १० विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला उघड आव्हानच दिले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटर बाँम्ब’मुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होईल असे वाटत असताना भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेने आव्हान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here