लम्पी स्किन डिसिज या संसर्गजन्य आजारावर लसीकरण मोहीम! कोटंबा ग्रामपंचायतीचा पुढाकार

सेलू : सध्या कोरोणाने सर्वत्र थैमान घातले असताना ग्रामीण भागात जनावरांना लम्पी स्किन डिसिज या संसर्ग जन्य आजाराने घेरले आहे. या रोगाचा सेलू तालुक्यात वाढता प्रकोप पाहता कोटंबा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पशुसंवर्धन विभागाचे वतीने लसीकरण मोहीम राबवीण्यात आली. शेतकर्‍यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत या कार्यक्रमाला आपला सहभाग नोंदविला.
गावात या रोगाचा प्रादुर्भाव पाहता सरपंच रेणुका कोटंबकर यांनी डॉ वंजारी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांचेशी संपर्क साधून येथे ही लसीकरण मोहीम राबवली. याबाबत गावात दंवडी देऊन लोकांना माहिती देण्यात आली यामध्ये गावातील १०० ते १५० जनावरांना लसीकरण करून इतर औषधोपचार करण्यात आले. तसेच विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांना त्वचेवर गाठी येणे व इतर बाबीवर औषधोपचार कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली शेतकर्‍यांनी दुर्लक्ष न करता औषधोपचार करावे असे आवाहन करण्यात आले यासाठी डॉ मिना काळे तालुका पशुसंवर्धन अधिकारी सेलू, सुरेश बांगडकर पशुधन पर्यवेक्षक, परिचर तथा फिरते पथक पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद वर्धा यांचे सहकार्याने ही मोहीम यशस्वी केली. यासाठी डॉ वंजारी पशुसंवर्धन अधिकारी याचे सहकार्य लाभले यावेळी उपसरपंच अरविंद तुमडाम, प्रकाश कोटंबकर माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक कांबळे, सुरज भोंगाडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here