डॉक्टरांना धमकी! कारवाई करण्याची मागणी; सामाजिक संघटनांचे निवेदन

देऊरवाडा/आर्वी : विविध माध्यमातून डॉक्टरांना धमकी देणाऱ्या आणि नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना इंडियन रेड क्रॉस असोसिएशन, लायन्स क्लब, मदत फाउंडेशन, लायन्स क्लब सेवा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी सामाजिक संघटनांनी निवेदन सादर केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, जनरल फिजिशियन असोसिएश्नन यांनी निवेदन दिले असून यात डॉक्टर रिपल राणे, डॉ. कालिंदी राणे, डॉ. अरुण पावडे, डॉ. प्रतिभा पावडे, डॉ. नीरज कदम, डॉ. श्यामसुंदर भुतडा, डॉ. अनिता भुतडा, डॉ. दिवाकर ठोंबरे डॉक्टर सुभाष बुधवानी, डॉ. प्रकाश चोरे आदी डॉक्टरांचा समावेश आहे.

रोहिणी अभिजित डवरे यांचा सिझेरियननंतर प्रसूतीपश्चात काही वेळाने अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेविषयी चौकशी होत आहे. राणे हॉस्पिटलचे डॉक्टर आणि राणेदाम्पत्यसुद्धा चौकशीला सहकार्य करीत आहे. असे असताना शहरातील व शहराबाहेरील काही संघटना समाज माध्यमांचा वापर करून डॉ. राणे दाम्पत्याला धमकावण्याचा, बदनामीकारक मजकूर टाकण्याचा, दवाखान्याची तोडफोड करण्याची भाषा करीत आहे.

त्यामुळे चिकित्सक वर्गात भीतीचे वातावरण आहे. अशी प्रकारची प्रक्षोभक भाषा वापरल्याने शहरातही तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते किंवा तसा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे शहरातील वातावरण गढूळ व तणावग्रस्त करण्याचा व॒ समाज माध्यमाद्वारे डॉक्टरांना धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. डॉक्टरांना धमकी देत त्यांना बदनाम करणाऱ्यांविरुद्ध काय कारवा होते, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here