सेलूत बहुजन समाज पार्टी तर्फे मान्यवर कांशीराम यांची जयंती उत्साहात साजरी

सेलू : बहुजन समाज पार्टी, सेलू तालुका तर्फे मान्यवर कांशीराम यांची जयंती बसपा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वक्त्यांनी मान्यवर कांशीराम यांच्या जीवनार प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आकाश म्हैसकर यांची उपस्थिती होती. कैलास मस्के, शंकर पाणबुडे, (बिव्हिएफ सयोजक) विशाल रंगारी, मिलिंद शंभरकर, मधुकर सोनटक्के, यांनी आपले विचार व्यक्त केले.

मान्यवर कांशीराम यांच्या जयंतीचे अवचित्य साधून पक्षसंघटन बांधणी उपक्रमाअंतर्गत प्रकाश रामजी घुटके यांची सेलू शहर महासचिव पदी तर हिंगणी सेक्टर अध्यक्ष पदी मधुकर बापूराव सोनटक्के व सुकळी-जयपूर सेक्टर अध्यक्ष पदी दिलीप रामदासजी टेभरे यांची सर्व विधानसभा व सेलू शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

यावेळी बसपा विधानसभा प्रभारी अरुण शंभरकर यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे संचालन बसपा विधानसभा प्रभारी राजेशजी चन्ने यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय वंडकर यांनी केले. कार्यक्रमाला धोंडबाजी गावंडे, विनोद जी पाटील, अशोक नाईक, शैलेश हाडके, प्रकाशजी घुटके, दिलीप टेभरे, मनोज कांबळे, दशरथ बुधबावरे, सरला सोनकुसळे, लक्ष्मी सोनपिटळे, विकी मेश्राम यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संखेने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here