वर्ध्यात कोरोनाचे १४७ नवे रूग्ण! दोन रुग्णांचा मृत्यू

▪️एकुण रुग्ण ३५८७
▪️एकुण कोरोनामुक्त १७५३
▪️एकुण मॄतक ९३
▪️एॅक्टिव रुग्ण १७४०

वर्धा : जिल्ह्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मंगळवार रोजी १४७ रुग्णांची भर पडली. ६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा १७५३ तर उपचार घेणारे आकडा १७४० वर पोहोचला आहे. दोन पुरुषांचा मॄत्यू झाला यात हिंगणघाट येथील ५७ वर्षीय व देवळी येथील ८६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मृतकांची संख्या ९३वर पोहचली आहे. चार दिवसांच्या जनता कर्फ्यूदरम्यान पुन्हा रुग्णसंख्या घटण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु कोरोना बाधितांची गेल्या २४ तासात वेगवेगळ्या तालुक्यातील १४७ जण बाधित झाले. त्यामध्ये वर्धा ७७ (पुरुष ५० महिला २७). देवळी १६ (पुरुष ८ महिला ८). सेलू १३ (पुरुष १० महिला ३). आर्वी ९ (पुरुष ४ महिला ५). आष्टी १ (पुरुष १). कारंजा १ (पुरुष १) .हिंगणघाट २८ (पुरुष २५ महिला ३). समुद्रपूर २ (पुरुष १ महिला १). एकुण १४७ मध्ये पुरुष १००. महिला ४७ यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here