खासदारांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचे “राख रांगोळी” आंदोलन! कांदा निर्यातबंदीचा तिव्र विरोध

योगेश कांबळे

देवळी : देशात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचा निषेध करत शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर खासदारांच्या घरासमोर आंदोलन होत आहे. वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने ता. २४ सप्टेंबर रोजी खासदार रामदासजी तडस (साहेब) याचें घरासमोर वर्धा येथे राख, रांगोळी आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून सरकारला निर्यातबंदी आदेश मागे घेण्यास भाग पाडावे याकरिता हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष उल्हास कोटमकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी कांदा सहा महिने मातीमोल भावाने विकला आत्ता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी करुन काद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नव्हे तर देशाचे आर्थिक नुकसान होणार आहे निर्यातबंदी करून शेतकऱ्याचे प्रपंचाची राखरांगोळी केली आहे शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करावयाचे असते. परंतु शेतकऱ्यांनी निवडून दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या प्रपंचाची राखरांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी गुरुवार ता. २४ सप्टेंबर रोजी खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर केंद्र शासनाने काढलेल्या कांदा निर्यातबंदी आदेशाची प्रती जाळून राख करुन कांद्याची रांगोळी काढली जाईल या आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसूदन हरणे, प्रदेशाध्यक्ष शे.स. सतीश दाणी, जिल्हा अध्यक्ष उल्हास कोटमकर, युवाध्यक्ष अरविंद राऊत, गणेश मुटे, देवळी तालुकाध्यक्ष मुकेश धाडवे, कार्याध्यक्ष प्रमोद तलमले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here