वृक्षारोपणातून अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना ; अण्णाभाऊंच्या विचारांना कृतीची जोड ! तपोवन संस्था व अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचा उपक्रम

पवनार : सामाजिक परिवर्तनाचे प्रखर प्रवक्ते, कष्टकऱ्यांचे लाडके साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पवनार येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. तपोवन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने पवनार परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्षारोपण करताना मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी समाजातील वंचित, शोषित, कष्टकरी घटकांच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे साहित्य सामाजिक क्रांतीची मशाल होते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने होत आहे. अण्णाभाऊ साठे यांचा विचार केवळ साहित्यापुरता न ठेवता, तो कृतीत उतरवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विजय बेंन्डे, गोविंद वानखेडे, रंजित धोंगडे, मंगेश वानखेडे, विठ्ठल पडघान, सचिन वानखेडे, शेखर लोखंडे, सोनु मुंगले, वैष्णव गायकवाड, अमोल गवळी, निलेश मुंगले, भुषण मुंगले, अजय जाधव, बबलू पडघान, रोशन मुंगले, प्रदिप आमटे, स्वप्निल मुंगले,हना जाधव, विक्की वाढवे, क्रिश मुंगले, समीर गायकवाड, गोलू गवळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here