‘मॅनेजर’ने केला रुपालीला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न! नांदगाव वडार वस्तीतील घटना

वर्धा : जेवण लवकर का केले नाही, या कारणातून वाद करीत पत्नीच्या पोटात चाकू भोसकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नांदगाव वडार वस्ती जवळील शेतात घडली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रूपाली भोसले ही शेतातून काम आटोपून घरी गेली असता तिचा पती मॅनेजर भोसले याने तू स्वयंपाक लवकर का केला नाही, असे म्हणून वाद करीत शिवीगाळ सुरू केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत तो चाकू आणण्यास घरात गेला असता रूपालीने तेथून निघत शेताकडे पळ काढला. रूपाली ही झाडाच्या पाठीमागे लपून बसली असता पती मॅनेजर हा तेथे गेला आणि पत्नी रूपालीला जमिनीवर पाडून तिच्या पोटात चाकूने भोसकले. याप्रकरणी रूपालीने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी मॅनेजरविरुद्भ जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here