पंचवटी चौकात आढळला मृतदेह

आर्वी : शहरातील पंचवटी चौकात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रशांत मधुकर उईके (3६) रा. रामदेवबाबा वॉर्ड असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

प्रशांत हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह पंचवटी येथील हनुमान मंदिराजवळ आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अमोल बरडे, श्याम वैद्य, मळनकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. प्रशांत याची हत्या झाली असावी असा अंदाज वर्तविली जात असून त्यादिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here