महालक्ष्मी कंपनीच्या पर्यवेक्षकास रॉडने जबर मारहाण! आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : कामावर येण्यास मनाई केल्याचा राग मनात धरुन तिघांनी कंपनीतील पर्यवेक्षकास रॉडने जबर मारहाण केली. ही घटना देवळी येथील महालक्ष्मी कंपनी परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली.

पोलीस सूत्रांनुसार, नीरजकुमार प्रल्हाद सिंग हा महालक्ष्मी टीएमटी कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामावर आहे. मजूर दर्शन मरसकोल्हे रा. सोनेगाव (आबाजी) हा त्याचा देखरेखीत काम करीत होता. दर्शन याने हाताने गेट पास तयार करुन काम सोडून जात असताना नीरजकुमार याने गेटवरून त्याला परत कामावर पाठवून तू उद्यापासून कामावर येऊ नको, असे म्ह्ट्ले. याचा राग मनात धरुन नीरजकुमार घरी जात असताना दर्शन मरसकोल्हे आणि त्याच्या सोबतच्या दोघांनी शिवीगाळ करुन रॉडने, फायटरने जबर मारहाण करीत नीरजकुमार याला जखमी केले. याप्रकरणी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here