“माझ्याशी बोल, अन्यथा जिवंत जाळून टाकील! युवतीला माथेफिरूची फोनवरून धमकी

वर्धा : माझ्याशी फोनवर बोल नाही तर, तुलाही अंकिता पिसुड़्ड सारखं जिवंत जाळून जळीतकांड घडविल, अशी धमकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 18 वर्षीय युवतीला दारोडा येथे राहणारा माथेफिरू प्रतीक गायधणे याने दिली. सदर माथेफिरू युवकाला पोलिसांनी अटक

यातील 18 वर्षीय युवती हिंगणघाट येथील महाविद्यालयात गेली असता आरोपी प्रतीक गायधणे याने तिच्या मोबाइलवर फोन केला. तू माझा कॉल ब्लॅाक लिस्टमध्ये का बरं टाकला, तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हटले. त्यानंतर सदर युवतीने मला तुझ्यासोबत बोलायचे नाही, असे म्हटल्यानंतर आरोपी प्रतीक याने सदर युवतीला तू जर पुन्हा माझ्यासोबत बोलायचे बंद केले तर, मी तुला जिवाने मारून टाकील. तुझ्यासोबत अंकिता पिसुड्रेसारखं जळीतकांड करेल, अशी धमकी दिली.

त्यानंतर सदर युवती दारोडा बसस्थानकावर आली असता आरोपी माथेफिरू तिचा हात पकडून रोडच्या खाली ओढत आणले व म्हणाला की, मी तुला तुझ्या आई- वडिलांसमोर घरून उचलून घेऊन जातो, असे धमकावत तेथून निघून गेला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपी प्रतीक गायधणे रा. दारोडा ता. हिंगणघाट याच्याविरुद्ध वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास वडनेर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here