मे रोजी रेल्वे रोको’ आंदोलन! सर्व गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी

पुलगाव : पुलगाव रेल्वे स्टेशनवरून धावणाऱ्या गाडयांचे थांबे पूर्ववत करण्याच्या मागणीवरून रेल्वे प्रबासी संघटनेव्दारे 1 मे रोजी पुलगाव येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात संघटनेने डिव्हिजनळ रेल्वे व्यवस्थापकाला निवेदन दिले. कोरोनाकाळात ज्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या त्या अजूनही बंदच आहे. कोरोनाकाळातील निर्बंध हटविण्यात आले तरीही गाड्यांचे चे थांबे पूर्ववत करण्यात आलेले नाही. पुलगाव येथे काही गाड्याचे स्टॉप बंद करण्यात आले होते. त्याकरिता 15 फेब्रुवारी 2021 ला निवेदन आले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आले. दरम्यान 29 ऑक्टोंबरला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यामध्ये आसपासचे शेकडो संख्येत नागरिक सहभागी झाले होते. परिणाम स्वरुप रेल्वे विभागाचे सोनी यांनी लवकरात लवकर पुलगाव स्टेशनवर सर्व गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु सात महिने लोटूनही पुलगावकर परिसर रेल्वे प्रवासी संघटनेच्या रेल्वे विभागाने कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांव्दारे 1 मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील. आदांलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष मनीषकुमार साहू यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here