14 वर्षांपासून फरार दोन्ही आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ठाणे येथून घेतले ताब्यात

वर्धा : शहर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र, २५/२००६ नुसार कलम ३०२, ३४ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी सुनील ऊर्फ सनी रमेशचंद्र झाडे तसेच राहुल रमेशचंद्र झाडे दोन्ही रा. साईनगर, वर्धा यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावल्यावर त्यांची नागपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. नागपूर येथील कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेले हे झाडे बंधू संचित रजेवर कारागृहाबाहेर पडले. पण रजा संपल्यावरही ते पुन्हा कारागृहात परतले नाहीत.

मागील चौदा वर्षांपासून फरार असलेल्या या दोन्ही बंदीवानांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेत त्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या निदेंशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, गोपाल ढोले, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, हमीद शेख, दीपक जाधव, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here