
वर्धा : सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग करीत अष्लिल शिवीगाळ करण्यात आली. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विवाहिता घरी एकटी असताना गावातीलच. नंदकिशोर उर्फ कान्हा अतकर आला आणि तुझा सरपंच पती कुठे आहे, तो लोकांची कामे करीत नाही, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. विवाहितेने हटकले असता त्याने विवाहितेशी बळजबळी करीत विनयभंग केला. तेवढ्यातच नागरिक जमा झाल्याने त्याने तेथून पळ काढला.