

वर्धा : बचत खात्याचे साक्षीदार मॅच होत नसल्याचे सांगून ओटीपी विचारुन व्यक्तीचे २८ हजार रुपयांनी फसवणूक केली. भूगाव येथील मेन कॉलनी परिसरात ही घटना घडली. चंद्रकांत नामदेव शास्त्रकार यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला त्याने बचत खात्याचे साक्षदार मॅच होत नसल्याचे सांगून त्यांचा ओटीपी क्रमांक विचारला. चंद्रकांत यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातून २८ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.