कांदा जीवनावश्‍यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे––– राज्य मंत्री बच्चू कडू

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्र सरकार जीवनावश्‍यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण, कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे, त्याला शोधले पाहिजे, अशी टीका राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केली.
केंद्र सरकार कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून वगळण्याचा विचार करीत आहे, यावर प्रतिक्रिया देताना राज्य मंत्री कडू बोलत होते. ते म्हणाले की, कांदा खाल्ला नाही, तर लोक मरतात, असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम म्हणून राहील. कांदा निर्यातीला सरकारने अनुदान दिली पाहिजे. कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून काढून त्याला अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी बोलताना केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here