१५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू! ‘लॉकडाऊन’ वाढवण्यावर ‘कॅबिनेट’चं एकमत

सायली आदमने

मुंबई : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यात, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, हा लॉकडाऊन आता वाढविण्यात आल्याचे समजते. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला असून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीही स्पष्ट सांगितलंय.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारायला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. त्यामुळे, 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, हा लॉकडाऊन किती दिवसांसाठी वाढविण्यात येईल, याचा तपशील लवकरच जाहीर होईल. पण, तो 15 दिवसांसाठी वाढविण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, राज्यात 15 मे पर्यंत पुन्हा कडक निर्बंध लागू असतील, असेच दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here