मटका अड्ड्यावर धाड! 13 दुचाकींसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शारदा चौकात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्यावर पोलिसांनी छापा मारला. यात तब्बल 11 जणांना अटक करण्यात आली असून 13 दुचाक्यासह रोख असा एकूण 3 लाख 50 हजार 380 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली

नंदलाल छेदालाल बडोद , लेखन छेदीलाल बड़ोद (60) भरत छेदीलाल बडोद (50) सर्व राहणार रा. शारदा चौक, श्रीकांत निलकंल मेश्राम (46) रा. दलीत सोसायटी, मनवर उत्तमराव लोखडे (50) रा.विसावा कॉलणी, विजय विठुल गायकवाड (59) रा. तारपुरा, संदिप समदास भगत (29) रा. शांती नगर, अहमद शाहा रोफशाह (45 )रा.कलम चौक, नामदेव वामन भुजाडे (48) हिम्मत विठ्ठलराव भगत (42) रा. बाको संभा नाना घोटेकर (36) रा. बोधगण जि. यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळली की, आठवडी बाजार परिसरातील शारदा चौक येथे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन करून नंदलाल छेदालाल बडोद हा त्याचे दोन्ही भावाचे सह राहत्या घराचे समोर सार्वजिनक जागेत लोकांची गर्दी जमवुन प्रत्यक्षपणे मोबाईलव्दारे पैसे घेऊन लोकांना वरली मटका जुगार खेळवत आहे. पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप परदेशी यांनी पंचासमक्ष संबंधित ठाकाणी छापा मारला. यावेळी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. पोलिसांनी पेन, वरली मटका साहित्य, आठ मोबाइल, 13 दुचाकी, रोख 26 हजार 330 रुपये असा एकूण 3 लाख 50 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here