स्कॉर्पिओची दुचाकीला धडक! 3 गंभीर; सेलू येथील वाय पॉइंटवर अपघात

सेलू : सेलू येथून वर्धेकडे जात असलेल्या दुचाकी गाडीला वर्धेकडून भरधाव येणार्‍या चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडला. श्रेयस घोंगे (19) रा. वर्धा, आयुष कुंभारे (19) रा. सिंदी व करण साटोने (20) रा. बोरगाव (मेघे) हे तिघेही टाकळी झडशी येथून जेवण करून दुचाकी क्र. एम. एच. 40 एव्ही 4332 ने सेलूमार्ग वर्धेकडे जात होते.

दरम्यान माहेर मंगल कार्यालयाजवळ वाय पॉइंटवर वर्धेकडून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहन एम.एच. 32 सी 7374 क्र. स्कार्पिओने जबर धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही तरुण रस्त्यावर फेकल्या गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेतून तिघांनाही सेलूच्या ग्रामिन रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी उपचार न करता गंभीर आहे, असे म्हणून सेवाग्राम रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती सेलु पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकी गाडीच समोरील भाग चुराडा झाला तर स्कारपीओ गाडीचा समोरील काच फुटून बरेच नुकसान झाले. अधिक तपास सेलू पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here