ट्रकच्या धडकेत कार पुलावर आदळली! कारच्या दर्शनी भागाचे नुकसान

पवनार : भरधाव वेगाने जानार्या कंटेनरने येथील धाम नदीच्या पुलावर कारला मागून धडक दिल्याने कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली यात कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवार (ता. २३) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. मात्र कुणीही जखमी झाले नाही.

एम एच ४० बीई ३८४१ ही कार वर्धेकडून नागपुरकडे जात होती दरम्यान मागाहून येणार्या ट्रक क्रमांक डब्ल्यू बी ३३ ई ९०२० याने कारला धडक दिली या धडकेत कार नदीपात्रातील पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली यात कारचे मोठे नुकसान झालले. अपघातानंतर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. सेवाग्राम पोलीससांना घटनेची मोहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्री कदम व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली. अधीक तपास सेवाग्राम पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here