भरधाव ट्रकची धडक! युवक गंभीर जखमी

तळेगाव (श्या.पंत) : येथील टि-पॉईंटवर रस्ता ओलांडत असलेल्याला युवकाला भरधाव ट्रकने धडक मारली. यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. आर्वी येथील सागर रामाजी परतेती (3५) हा तळेगाव टि-पाईंटवर रस्ता ओलांडत असताना नागपूरकडून गुजरातकडे जाणाऱ्या सी. जी. ०७ सी. ई. ४९७७ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली.

यात सागर हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तळेगांव पोलिसांना माहिती देत जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी राजू शाहू, सुरज राठोड, अमोल इंगोले यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here