लग्नाचा तगादा लावून युवतीचा केला विनयभंग! पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

वर्धा : लग्नाचा तगादा लावून रस्त्यात अडवून युवतीचा विनयभंग केल्याची घटना हिंगणघाट शहरात १० रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. २३ वर्षीय युवती आणि आरोपी श्याम अशोक सातपुते हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. श्यामने एप्रिल २०१९ रोजी युवतीला तू मला आवडते माझ्याशी लन करशील काय, अशी विचारणा केली होती. तेव्हा युवतीने हा निर्णय माझ्या घरचे घेईल, मला लग्न करायचे नाही, असे म्हणत नकार दिला.

मात्र, आरोपी श्याम हा तेव्हापासून युवतीचा पाठलाग करुन माझ्याशी लग्न न केल्यास तुला जीवे ठार मारेल अशी धमकी देत होता. १० रोजी युवती तिच्या मावशीकडे जात असताना आरोपी श्यामने तिला रस्त्यात अडवून पुन्हा लग्नाची गळ घातली. मात्र, युवतीने नकार दिला असता त्याने विनयभंग करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी युवतीने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here