

वर्धा : घरात अभ्यास करीत असलेल्या मुलीला अभ्यास नको करू, असे म्हणत वडिलाने रॉडने पाठीवर मारहाण करीत जखमी केले. नागठणा परिसरात ही घटना घडली. संध्या शिंदे ही मुलींसह घरी असताना पती शेखर शिंदे हा घरी आला. दरम्यान मोठी मुलगी अभ्यास करीत असताना शेखरने तु अभ्यास कश्याला करते, असे म्हणत शिवीगाळ केली. मुलीने शिवीगाळ करण्यास हटकले असता शेखरने मुलीच्या पाठीवर रॉडने मारहाण केली. संध्या वाद सोडविण्यास मध्यस्थी गेली असता तिलाही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.