
कोलकाता : आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाची हाय व्होल्टेज सीट असलेल्या नंदीग्रामकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी जिंकणार की पडणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण परतू लागले आहे.
सध्याच्या कलांनुसार भाजपाला ८८ जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूल काँग्रेसला २०२ जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 100 पेक्षा जास्त जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे.















































