

वर्धा : कोविड -१९ हा आजार सध्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. सेलू तालुक्यात ६२ ग्रामपंचायती असून १ लाखाचे वर लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसा गणिक वाढत आहे. दवाखान्यात ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर तर मिळतच नाही.
अशा परिस्थीतीत रुग्णांचा उपचाराअभावी घाबरुन मृत्यू होत आहे.
याकरिता साहसिक जनशक्ती संघांना केळझर येथील सुनिता नर्सिंग स्कुलमध्ये ५० बेड उपलब्ध असून १२०० स्केअर पूटचा हॉल तर ६०० स्केअर फुटाचा दुसरा हॉल उपलब्ध आहे. तसेच संडास, बाथरुम, बगीचा, किचन या सर्व गोष्टी उपलब्ध आहे.
याठीकाणी अस्थमा, दमा, ब्लडप्रेशर, शुगर, कँन्सर अशा रुग्णांना कोविड लागण झाल्यास या ठिकाणी त्यांना आयसोलेशन करुन त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येईल. तसेच या सर्व लोकांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची , औषधांची व्यवस्था साहसिक जनशक्ती संघांना व मित्रमंडळ करण्यास तयार आहे. २ डॉक्टर व ३ नर्स व वार्डबॉयची व्यवस्था जिल्हाधिकारी यांनी करुन द्यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदनातून केली आहे.