

वर्धा : घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणातून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला कारागृहाची हवा खावी लागली असून तीन महिने कारावासाची शिक्षा, १ हजार रुपये दंडाची तसेच देड न भरल्यास १७ दिवसांच्या कारवासाची शिक्षा न्यायाधीश भूमीत अग्रवाल यांनी ठोठावली. वंदना गणेश अंडूस्कर (रा. त्रिमूर्तीनंगर) यांच्या घरासमोर आरोपी योगेश जानबा रामटेके, जानबा पांडुरंग रामटेके यांनी कचरा टाकल्याने वंदनाने त्यांना हटकले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारन्याची धमकी दिली होती. १३ डिसेबर २०१७ मध्ये वदना यां रामनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचा तपास नरेंद्र पारा यांनी करून पुराव्यानुसार न्यायालय ४ एप्रिल २०१८ मध्ये दोषारोप दाखल केले होते.
प्रकरण न्यायाधीश अग्रवा यांच्यासमोर न्यायदानासाठी आले असता पैरवी अधिकारी संजय चावके पवन यादव यांनी ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात सरकारी अभियोक्ता रवींद्रकुमार चौधरी यांनी साक्षपुरावे तपासून युक्तिवाद केला न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी योगेश जानबा रामटे याना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.