
पवनार : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या कार्यक्रमास काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सानथोरांपासून सर्वांनाच ज्ञात आहे. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय म्हणून मोठ्या उत्साहाने हा दिवस शिवभक्त साजरा करतात.
या कार्यक्रमाला सरपंच, शालिनी आदमने, ग्रामविकास अधिकारी ए. व्ही. डमाळे, पंचायत समिती सदस्य, प्रमोद लाडे, ग्रामपंचायत सदस्य, राजेन्द बावणे, राम मगर, मुनेश्वर ठाकरे, प्रमोद सरोदे, प्रशांत सावरकर, शकुंतला नगराळे, गीता इखार, मंगला कुत्तरमारे, रोशनी अवचट, नलिनी ठोंबरे, शारदा वाघमारे, प्रतिभा बोरघरे व ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.


















































