प्रेयसीच्या अत्याचाराची चित्रफीत टाकली फेसबुकवर; चंद्रपुरातील घटना

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : प्रेमात वितुष्ट आल्यानंतर दुरावलेल्या प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बनावट आयडी तयार करून फेसबुकवर टाकला. पीडिताच्या तक्रारीवरून आराेपीला अटक करण्यात आली आहे. सन्मुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (वय २५) असे आराेपीचे नाव आहे. ताे शहरातील शिवाजी वाॅर्डातील रहिवासी आहे.

सन्मुखसिंगचे शहरातील एका २९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. परंतु, काही दिवसांतच दाेघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. प्रेयसीला धडा शिकविण्याचा निर्धार प्रियकराने केला. वाद मिटवायचा आहे असे म्हणून एक जून राेजी त्याने तिला जंगलात बाेलविले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्याचे स्वतःच्या भ्रमणध्वनी मध्ये चित्रीकरण केला.

शुक्रवारी तिचा वाढदिवस हाेता. याचे निमित्त साधून त्याने बनावट फेसबुक आयडी तयार केली आणि व्हिडीओ अपलाेड केला. या अत्याचाराच्या चित्रफितीने बल्लारपुरात एकच खळबळ उडाली. या चित्रफितीत दिसणारी युवती बल्लारपुरातील आहे, याची माहिती लाेकांना झाली. युवतीच्या कुटुंबीयांना याची माहिती झाली. त्यानंतर पीडिताने बल्लारपूर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी सन्मुखसिंगविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here