चोरट्यास पश्चिम बंगालातमध्ये अटक! मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठाने केली होती टार्गेट

वर्धा : वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठानांना टार्गेट करणाऱ्या कोल्ड माईंड अट्टल चोरट्यास पोलिसांनी पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथून ताब्यात घेत अटक केली. देवाशिष मेघनाथ सरकार असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

अज्ञात चोरट्यांनी राजेश राठी यांच्या मोहता मार्केट भागातील दुकानातून रोख रक्‍कमेसह लॅपटॉप, चार्जर, वायफाय असा एकूण 15 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल तर नितीन शाहू यांच्या कपड्याच्या दुकानातून 87 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तर पवन डोंगरे यांच्या फर्निचरच्या दुकान, गिरीश गांधी यांचे किराणा स्ट्रोअर्स तसेच गोंड प्छॉट भागातील एका घराला चोरट्यांनी टार्गेट केले होते. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. खात्रीदायक माहितीच्या आधारे या गुन्ह्यात अटल चोरटा सरकार याचा सहभाग असल्याचे पुढे आल्याने त्याच्या शोधार्थ पोलिसांची एक चमू पश्चिम बंगाल येथे पाठविण्यात आली.त्यानंतर मोठ्या शिताफिने पोलिसांनी कोलकत्ता येथून चोरट्या देवाशिष मेघनाथ सरकार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, रोख रक्‍कम, चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाइल असा एकूण १0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार पराग पोटे, यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक उमेश उगले, पोलिस हवालदार पंकज भरणे, कुलदीप टाकसाळे, अक्षय राऊत, प्रशांत वंजारी, श्रावण पवार, वैभव जाधव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here