
समुद्रपूर : तालुक्यातील परडा गावात बुधवारी वादळीवाऱ्यासह पावसामुळे काही घरावरील टिनपत्रे उडाली. शिवाय छत कोसळल्याने बैल जखमी झाला. बुधवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारात वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
याच वादळादरम्यान परडा गावातील पंढरी चंदनखेडे यांच्या घरावरील छत पूर्णतः कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर किशोर महाजन यांच्या घरावरील टिन पत्रे उडाली. तसेच वादळामुळे उडालेला टिनपत्रा लागल्याने विठ्ठल चंदनखेडे यांच्या मालकीचा बैल जखमी झाला. नुकसानीचा पंचनामा करून नुकसाग्स्तांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी आहे.

















































