अर्थसाहाय्यासाठी ८९७ ऑटोरिक्षा चालकांच्या अर्जाची झाली पडताळणी! पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होताहेत १ हजार ५०० रुपये

वर्धा : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ओटोरिक्षा चालकांसाठी १ हजार ५०० रुपये देण्याची अर्थसाहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ८९७ व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले असून या सर्वच अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात शासकीय अनुदानाची रक्‍कम जमा होत आहे.

कोविड संकटामुळे जिल्ह्यासह राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले. याच निर्बंधांमुळे आर्थिक संकट ओढवलेल्या प्रत्येक औटोरिक्षा चालकाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ऑटोरिक्षा परवाना धारकांसाठी अर्थसाहाय्य योजना सुरू केली. जिल्ह्यात एकूण 3 हजार ४३१ ओऑटोरिक्षा परवानाधारक असून, आतापर्यंत ८९७ व्यक्तींनी शासनाच्या या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे. त्यापैकी ६६१ अर्ज योजनेच्या लाभासाठी पाठ ठरले असून, उर्वरित २३६ अर्ज पुतः सादरीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. तसा एसएमएस अर्जदारांना पाठविण्यात आला आहे. कुठल्याही बोगस लाभार्थीच्या बँक खात्यात शासकीय अनुदानाची रक्‍कम जाऊ नये, यासाठीची विशेष दक्षता अर्जाची पडताळणी करताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी घेत आहेत.

या संकेतस्थळावर करावा अर्ज

ऑटोरिक्षा परवानाधारकांसाठी असलेल्या अर्थसाहाय्य योजनेच्या लाभासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट उन’ या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतो. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.

आधार लिंक गरजेचीच

अर्ज सादर केलेल्या व्यक्तीचा आधार क्रमांकत्याच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. प्राप्त अर्जाची पडताळणी झाल्यावर सदर अर्जावर पुढील आवश्यक प्रक्रिया होते. शिवाय, योजनेच्या लाभास पात्र ठरलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात थेट १ हजार ५०० रुपये जपा होत असल्याचे सांगण्यात आले.

एसएमएसद्वारे पात्र-अपात्रतेची माहिती

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या व्यक्तीला त्याने नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याचा अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरला की अपात्र. याची पाहिती एसएमएसद्वारे मिळते.

२४ तासांत निकाली काढला जातो अर्ज

ऑनलाइन पद्धतीने प्राप्त आलेल्या अर्जांची घडताळणी वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अवघ्या २४ तासांच्या आत केली जात आहे. पडताळणी होताच अर्ज करणाऱ्याच्या माेबाइलवर एसएमएसद्वारे अर्जावर काय प्रक्रिया झाली, याची माहिती मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here