

योगेश कांबळे
देवळी : तालुक्यातील बोपापुर दिघी येथील शेतकर्याची शेती यशोदा नदी पलीकडे असल्याने नदीला पाणी असल्याने शेती वहीवाटीसाठी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बोपापूर गावातील शेतकर्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता कापूस वेचणी व सोयाबीन संवगनीचे दिवस असल्याने शेतीपयोगी माल कसा आणावा? याचे संकट शेतकर्याना सतावत आहे.
यशोदा नदीच्या पलीकडे बोपापुर दिघी येथील 75 शेतकर्याच्या पलीकडे शेत्या आहेत. नदी मध्ये पाणि असल्यामुळे शेतातील धान्यं कसे आणायचे असा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. शेतकरर्याची ही समस्या 15 वर्षा पासून ची आहे. याबाबत प्रशासनास व लोकप्रतिनिधी ना अनेकदा तक्रारी दिल्या पंरतु आश्वासना शिवाय काहीही पदरात पडले नाही.
बजाज फाऊंडेशन नी नदीचे खोलीकरण केल्यामुळे अपूर्ण झालेली शेतकर्याची कामे अजून पर्यन्त पूर्ण झाली नाहीत. या बाबत जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करण्यात आली असतांनाही यशोदा नदीवर च्या पुलाचे काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे बोपापूर वांसीयायाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या जोसना राऊत यांचेसह अनेक महिलांनी केली आहे.