जल प्राधिकरण कार्यलयातील बोगस कारभार! जलसंपदा मंत्र्यांना भिम आर्मीच्या वतीने निवेदन

वर्धा : जिल्ह्यात जल प्राधिकरण कार्यलया व तक्रार निवारण केंद्र असून त्या कार्यलया पासून 12 गावांना पाणीपुरवठा चा लाभ मिळतो, परंतु जल प्राधिकरण कार्यलयातील ठेकेदार यांनी सिधी मेघे येथील नळ कलेक्शन देण्याच्या नावावर अवैध पैसे ग्राहक कडून घेऊन ग्राहकांची फसवणूक केलेली आहे.

विशेष बाब म्हणजे असे एकच प्रकरण नाही तर किती तरी प्रकरण कार्यलयात गेल्या 6 ते 7 महिन्यापासून धूळ खात पडलेली आहे. नवीन नळ कलेक्शन देण्याच्या नावावर ठेकेदार व कार्यलयातील अधिकार यांनी ग्राहकाकडून कोणतेही अमानत रक्कम न भरता नळ कलेक्शन देण्यात आल्याचे लक्षात आले आहे. व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे.

वारंवार तकार करून ही ठेकेदार याच्या वर गेल्या 6ते 7 महिन्यापासून कार्यवाही न करता ठेकेदार याला वाचण्याच्या प्रयत्न करत कार्यलयातील अधिकारी करत असल्याचे सोमोर आले आहे. ग्राहकाकडून अमानत घेऊन ही कार्यलयात न भरल्याने ग्राहकांना याच्या मोठा धक्का बिलाच्या स्वरूपात बसणार आहे. विशेष म्हणजे हे कार्यलय लहान असल्याने याकडे कोणी लक्ष देत नसून मोठ्या प्रमाणात कार्यलयात भष्टाचार सोमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण यावर कार्यवाही करून झालेला ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी याच्या कार्यवाही करून फसवनुकीचा गुन्हा दाखल करून त्याच्या कडून केलेल्या कलेक्शनची चैकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here