क्षुल्लक वादातून विवाहितेला मारहाण

वर्धा : घरापुढील रस्त्यावर ओरडण्यास मनाई केली असता, चौघांनी विवाहितेस शिवीगाळ करून मारहाण केली. बुरड मोहल्ल्यातील संत चोखोबा वॉर्ड
परिसरात ही घटना घडली. रितीक कोबे, शैलेश कुडमते, पोगा कुडमते, रोशन कुडमते हे श्रद्धा संतोष पुसनाके यांच्या घरासमोरील रस्त्यावर आरडाओरड करीत होते. श्रद्धाने त्यांना आरडाओरड करण्यास मनाई केली असता, चौघांनीही शिवीगाळ सुरू केली. श्रद्धाचे पती संतोष यांनी मध्यस्थी केली असता, चौघांनी त्यांना धक्काबुक्की केली.वाद सोडविण्यास श्रद्धा गेली असता, तिलाही दगडाने मारहाण करण्यात आली. हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here