दुचाकी चोर ‘अभिषेक’ पोलिसांच्या जाळ्यात

आर्वी : अज्ञाताने युवकाच्या घरासमोरून दुचाकी चोरून नेली होती. याचा तपास आर्वी पोलीस करीत असतानाच पोलिसांनी अट्टल दुचाकी चोर अभिषेक निर्मुण वाणे (रा. टाकरखेडा) याला ताब्यात घेत अटक करून दुचाकी हस्तगत केली. व्यक्‍तीची एम.एच. ३२, एल. ३९८४ क्रमांकाची दुचाकी चोरट्याने घरासमोरून चोरून नेली होती. याबाबत आर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात पोलीस तपास करीत असताना त्यांनी आरोपी अभिषेक वाणे यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात रणजित जाधव, अनिल वैद्य सुनील मळनकर, सतीश नंदागवळी, प्रदीप दातारकर, सैनिक मोहन यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here