जुन्या वादातून युवकावर चाकू हल्ला! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : जुन्या वादातून दुचाकीने जात असलेल्या युवकावर अचानक चाकू हल्ला करुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना येथील हिंदनगर परिसरातील माता मंदिरासमोर घडली.

याप्रकरणी प्रफुल जीवनराव ताकसांडे याच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी गहु लोखंडे रा. हिंदनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रफुलसोबत गुडुने यापूर्वी वाद घातल्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग मनात धरुन हा हल्ला केला. बुधवारी सायंकाळी प्रफुल दुचाकीने जात असताना आरोपीने चाकुने हल्ला केला. यात प्रफुलच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here