विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह! वायगाव (नि.) येथिल घटना

वर्धा : विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली ही घटना सावंगी पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या वायगाव (निपानी) परिसरातून समोर आली. मृतकाचे नाव मंगेश अशोक मानकर (37) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार वायगाव (निपानी) परिसरात संजय विठ्ठल हळदे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच सावंगी पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. चौकशी केल्यानंतर हा मृतदेह वायगाव रहिवासी मंगेश मानकर याचे असल्याचे स्पष्ट झाले. मंगेश 9 जानेवारीपासून घरुन गायब होता. घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here