खेळाच्या माध्यमातून वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करणार दोन चिमुकले! करुणाश्रम परिसर

वर्धा : मागील काही दिवसापासून कोरोना विषाणुचा विळखा घट्ट होत असल्याने शाळा महाविद्यालयांना सुट्या दिल्या आहेत. लॉकडाउनमुळे विविध अस्थापना बंद केल्याने लहान मुले आपापल्या घरात बंद आहेत त्यामुळे बच्चेकंपनीने मनोरंजनासाठी विविध खेळांचा आधार घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्ध्यातील करुणाश्रमातील दोन चिमुकले ओम आणि सोहम शाळांना सुट्या असल्याने आपल्या परिसरात असलेल्या चिंच, चीचबिला तोडायला घराबाहेर जातात दोघेही मनमोकळ्यापणे आनंद घेत आहे. सोबतच या फळांच्या बीया काढून पावसाळ्यात लावण्याची तयारी या चिमुकल्यांनी सुरू केली आहे.

निसर्गाचा समतोल राखण्याकरीता वृक्ष लागवडीची नितांत गरज आहे हे माहित असल्याने दोन्ही चिमुकल्यांकडून वृक्षलागवडीची मोहिम राबविली जानार आहे. चिंचा व चिचबीला आणल्यानंतर त्याला फोडून त्यातील बीया काढण्याचे काम सध्या या दोघांकडून सूरु आहे. दोघानी किती बिया काढल्या त्या मोजून ठेवत त्याला सांभाळून ठेवतात पावसाळा सुरू झाला की या बीया जमीणीत लावण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे सतत अभ्यास व टीव्ही समोर राहण्याचा वेळ वाचतो आणि कामेही होत आहेत. लहानपणापासूनच अशा प्रकारे कामाची थोड्या प्रमाणात का होईना पण कामाची सवय त्यांना लागल्याचे दिसत आहे.

अनेक ठीकाणी याउलट चित्र पाहायला मिळते धावपळीच्या युगात अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लहान मुले स्पर्धेच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. शाळा, शिकवणी, विविध स्पर्धांची तयारी, विविध पाश्चात्य खेळांचे सराव आदी कामात वेळ जात असल्याने मुले गुरफटुन गेली आहेत. त्यामुळे एकांत आणि मनासारखे मोकळे मुलांना खेळता देखील येत नाही.

आपल्या मुलांचे चिंचा तोडतांना आणि त्या फोडून त्यातील बीया बाहेर काढतानाचे फोटो आशिष गोस्वामी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्याने ते पाहुन अनेकांना आपल्या मुलांना केवळ घरात बंदीस्त करुन न ठेवता त्यांना मनमोकळेपणाने बागडण्यास सोडण्याचा विचार पालकांच्या मनात येत असला तरी लॉकडाउनमुळे आता ते शक्य नाही मात्र सतत टिव्ही व मोबाईल खेळल्याने अनेक समस्या लहान मुलांमध्ये निर्माण होत आहे.

मुलांना बंदीस्त करुन ठेवू नका

सतत अभ्यासाचे, परीक्षांचे दडपण असल्याने मुले सतत तणावात रहात आहेत. त्यात पालकांचे संवादापासून दुर जाणे, कुटुंबाला वेळ न देणे, महिलांचेदेखील टिव्हीवरील मालिकात, सोशल मिडीयावर गुंतणे, यामुळे मुले एकलकोंडी झालेली आहेत. या मुलांना मनसोक्त खेळणे, बागडु देण्याची गरज आहे.

आशिष गोस्वामी, पिपल फॉर अँनिमल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here