दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

रामटेक : भरधाव दुचाकीची रस्त्यात मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली. अपघाताची ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामधाम, मनसर येथे २६ मार्च रोजी घडली.

प्रतीक शुद्धोधन मेश्राम (२५, रा. प्लॉट नं. ८२, गौरीसुत्र अपार्टमॅंटजवळ, आर्यानगर, कोराडी रोड, नागपूर), असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रतीक दुचाकीने (क्र. एमएच-४९/आर-3६२५) मैत्रीण पूजा भास्कर बारापात्रे हिच्यासह रामटेक येथून म्रनसरकडे जात होता. दरम्यान, मनसर येथील रामधाम परिसरात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला दुचाकीची धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली त्याची मैत्रीण जंभीर जखमी झाली.

याप्रकरणी सिद्धांत शुद्धोधन मेश्राम (२१, रा. प्लॉट नं.८२, आर्यानगर, कोराडी रोड, नागपूर) यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास पोलीस नाईक गजानन उकेबोंद्रे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here