बापानेच केला चिमुरडीला जीवे मारण्याचा प्रयत्न

वर्धा : पत्नीला खावटी द्यावी लागेल, या कारणातून मद्यधूंद स्थितीत असलेल्या विकृत बापाने दोन वर्षीय चिमुरडीचे दोन्ही पाय पकडून तिला गोलगोल फिरवून जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सेवाग्राम येथील उगले लेआऊट परिसरात घडली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मुन्नी आसीफ शेख ही घरी असताना पती आसीफ हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. मुन्नी हिने त्याला गॅस सिलिंडर
तिच्या भावाकडे पोहचवून देण्यास सांगितले असता आसीफने मुन्नीला शिवीगाळ करीत घरातील साहित्याची फेकाफेक केली. बाजूला बसलेल्या दोन वर्षीव चिमुकलीला पाहून म्हणाला की, तु जिवंत राहिलीस तर मला खावटी द्यावी लागेल, असे म्हणून चिमुकलीचे दोन्ही पाय हातात पकडून तिला गोलगोल फिरवून जमिनीवर आपटून जीव घेण्याचा प्रयत्न केला.

चिमुकलीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून तिच्या डोक्यात रक्त जमा झाल्याने तिला सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात उपचयरार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मुन्नी शेख हिच्या तक्रारीहून आसीफदिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सेवाग्राम पोलिसानी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here