नंदा नदी झाली प्रदुषीत! पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य; नदीपात्रात सर्वत्र हिरवी शेवाळ पसरल्याने नदीला गटाराचे स्वरुप

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : शहराच्या सौंदर्याचा मानबिंदू असलेल्या नंदा नदीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन संपूर्ण पात्रात पाणी प्रदुषीत झाले आहे. नदीपात्रात सर्वत्र हिरवी शेवाळच नजरेस पडत आहे. परिणामी ही नदी नाही तर गटारगंगा असल्याचा भास होत आहे.

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नंदा नदीमुळे शहर दोन भागात विभागल्या गेले तरी सुध्दा गतकाळात शहरात असलेल्या पाणी दुष्काळात याच नंदा नदीमुळे शहराची पाण्याची गरज पुर्ण होत होती परिणामी ही नंदा नदी शहराचा प्राण ठरत होती. मधल्या काळात शहराचा विकास झाला शहरात पालिकेची पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली आणि नंदा नदी केवळ सांड पाणी वाहणारा नाला बनुन राहली.

आज शहरात विकासाच्या नावाने संपूर्ण शहर क्रांक्रेटचे जगल झाले. “पाणी अडवा पाणी जीरवा” संकल्पनेला शहरात पुर्ण हळताळ फासल्या गेली. यात शहराचा प्राण असलेल्या नंदा नदीकडे सुध्दा दुर्लक्ष झाले. आज या नदीत सर्वत्र घाणचघाण असुन संपूर्ण नदीवरच शेवाळाची हिरवी चादर पसरली आहे. ही नंदी नसुन “घटारगंगा” झाली आहे.

विकासाच्या मोठमोठ्या गप्पा हाकणार्या लोकप्रतिनिधीचे या शहराच्या सौदर्यीचा मानबिंदू असलेल्या नंदा नदीच्या स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधीनी शहराच्या या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नदी पात्राच्या स्वच्छतेसाठी नीधी उपलब्ध करावा आणि नदी स्वच्छ करुन शहराचे सौंदर्य जपावे अशी शहरवासीयांची मागणी आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here