कडक लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याने शेतकरी संकटात! बाजारात विक्रीसाठी तोडून ठेवलेला माल वाया जाणार; प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने शेतमाल विकुन देण्याची शेतकर्यांची मागणी

वर्धा : जिल्ह्यात पाच दिवसाच्या कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. गुरुवार (ता.१३) सकाळी ७ वाजतापर्यत याची अमलबजावणी करण्यचे आदेश होते त्यानुसार शेतकर्यांनी सकाळी लॉकडाउन खुलेल या अाशेने आज बुधवार (ता १२) शेतमालाची विक्री करण्याकरीता शेतातील माल तोडून ठेवला मात्र दुपारी जिल्हाधिकार्यांच्या धडकलेल्या नविन आदेशाने शेतकर्यांच्या पायाखालची जमीणच सरकली.

पाच दिवसाचा पुन्हा कडक लॉकडाउन लागल्याने शेतकर्यांनी विक्रीकरीता तोडून ठेवलेला माल आता विकायचा कसा असा प्रश्न शेतकर्यांसामोर पडलेला आहे. लॉकडाउनमुळे तोड होत नसल्याने आधीच शेतातील माल झाडालाच खराब होत आहे. लॉकडाउन खुलेल या अपेक्षेने शेतक्यांनी तोडलेला माल आता रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे. आधीच आसमाणी संकटाने शेतकरी हवालदील झालेला आहे त्यात या आदेशाने भर पाडली आहे.

या कठीण परिस्थितीत शेतकर्यांनी काय करावे कुठे जावे आणि कसे जगावे असा प्रश्न आता शेतकर्यांसामोर उभा ठाकला आहे. यावर जिल्हाप्रशासनाने विचार करुन यावर तोडगा काढत कडक लॉकडाउन रद्द करावा आणि शेतकर्यांना भाजीपाला विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकर्यांना ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्री करता येने शक्य नाही. जिल्हाप्रशासनाने शेतकर्यांचा विचार करुन गर्दी होणार नाही याची काळजी घेत शेतमाल विक्रीस परवानगी द्यावी शेतकरी आधीच संकटात आहे त्यात प्रशासनाने आनखी भर पाडू नये नविन आदेश रद्द करुन शेतकर्यांनी तोडून ठेवलेला माल विकण्याची मुभा द्यावी. नाहीतर प्रशासनाने तो ऑनलाइन पद्धतीने विकुन द्यावा.

बाळाभाऊ माऊसकर, प्रयोगशील शेतकरी नालवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here