प्रवाहित वीजतारांना स्पर्श! तीन गाईंचा मृत्यू; ६० हजार रुपयांचे नुकसान

देवळी : तालुक्‍यातील कोल्हापूर (राव) येथे प्रवाहित वीजतारांना स्पर्श झाल्याने तीन गाईंचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत गोपालकांचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.

गुरुवारी दुपारी १२ वाजता गावातील जनावरे खडसे यांच्या शेतीकडे चरण्यासाठी गेली होती. खडसे यांच्या पडिक असलेल्या शेतामध्ये ती. चरत असताना त्याठिकाणी थ्रीफेज लाईनच्या तारा तुटून पडल्या होत्या. या प्रवाहित वीजतारांना स्पर्श होऊन तीन गाईंचा मृत्यू झाला. यात पुंडलिक मोकाशी, वासुदेव दांडेकर व पुंडलिक नगराळे यांचे प्रत्येकी २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

घटनेविषयी माहिती सरपंच हरिभाऊ देवतळे यांनी पोलीस ठाणे देवळी व देवळी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच देवतळे यांच्यासह नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर वीजतारा तुटण्याच्या घटना घडतात. मात्र, वेळीच दुरुस्ती होत नाही.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here