सरकारी कार्ड काढा अन् रोजगार मिळवा

वर्धा : जिल्ह्यामध्ये असंघटित कामगारांची संख्या मोठी आहे. या असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासोबतच रोजगार उपलब्धीकरिता माहिती गोळा करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे, याद्वारे असंघटित कामगार त्यांचे आधारकार्ड लिंक करून ई-श्रम कार्ड काढू शकणार आहे. जिल्ह्यातही ही नोंदणी सुरू झाली असून, असंघटित कामगारांची माहिती उपलब्ध होत आहे.

कार्ड काढणारयांना मिळणार हे लाभ

केंद्र सरकारकडून असंघटित कामगारांचा डेटा तयार करीत आहे, प्रारंभी असंघटित कामगारांनी ई-श्रम कार्ड काढल्यानंतर त्यांना एक वर्षांकरिता विमा दिला जात आहे.

यामध्ये कामगाराचा अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये मिळतील, तर अपघातामध्ये अपंगत्व आल्यास एक लाखाची मदत मिळणार आहे, अशी माहिती सीएससी ई-गव्हनर्सचे जिल्हा व्यवस्थापक किरन बुलकुंडे व संचिन घालणी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here